षटकोळी
षटकोळी
मन
मन क्षणभंगूर पक्षी
उडतोय आकाशाच्या पार
कधी उंच झेपावतो
पाताळात घूसतो कधी
स्वच्छंद वाऱ्या सारखा
समुद्रा सम खवळतो
श्वास
जगायला पाहिजे श्वास
प्रदूषण करतोय घात
वृक्षांची छाया दुर्मिळ
जिकडे बघावे घान
घेवूनी आन स्वच्छतेची
कामी लागा समुळ
हा "सागरी किनारा"
हाच सागरी किनारा
कधी खवळत रागाने
शांतीचाही संदेश देतो
कार्य असे महान
पिकवी मोती मानके
कित्येक जीव पोसतो
"नजर"
अनंतात असावी नजर
कार्यात तल्लीन होवूनी
दयामाया असावी मनात
अल
गद भार उचलावा
संर्वागात येतसे तेज
कोणतीच नसे खंत
"बापू"
आज बापूची जंयती
मनापासूनी त्यांना स्मरा
क्रृरतेसी बघा झुंजले
सत्य अंहिसा अस्त्रांनी
देशमुक्तीसाठी दिला लढा
तनमनधन देशाला अर्पिले
"नभांगन"
स्मित हास्य करूनी
हसती तारे नभांगनी
हर्षुनी शशि धावतो
पळतो ताऱ्या मागे
मेघ करती मधेमधे
द्वेशाने वेडा होतो
"शब्दांची फुले"
आभार व्यक्त करताना
वाहतोय शब्दांची फुले
संचलनकर्ता कधी कधी
रसिकांना सदा हसवून
उधळतो शब्दांची फुले
शक्कल लढवून साधी