STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

गणपती

गणपती

1 min
25.9K


गनपती ....१


तूच सुखकर्ता तूच दु:खकर्ता

तुच विद्येचे ज्ञानामृत पाज ना

कर सकलांचे कल्यान जगी

दे सुबूद्धी वाट चुकलेल्यांना...


सुविचार....२


आपण देवाची मूर्ति विकत घेतो

रुपयांचा भाव करित असतोय

आणि मूर्ति आणली घरात की

गणपतिला लक्ष्मी मागतोय..


या पाखरांनो....३

या पाखरांनो उंच भरारी घेवूनी

सुजलाम् सुफलाम् ज्योती पेटवूया

सर्वधर्म समाज सबळ करूनी

ज्ञानरूपी आकाशात झेप घेवूया..


पर्यावरण...४


पर्यावरणाचा तो देवता असे

विटंबना करतोय हा मनुष्यच

आधी सृष्टीचे बिघडवले तंत्र

आता देवावर आनिले संकटच


शृंगार....५


डोंगरात हे सुंदर कौलारु घर

जोपासना केली कष्टकऱ्यांने

बघा या सौंदर्यात कसा भरला

आल्हाद या हिरव्या शृंगाराने..


कर्ज.....६


पैसे पदरात राहील पदरमोड करू

नाहीतर उभा जन्म काढू कर्जात

सपसिडी भेटायची वाट पहातो

पण बँकेवाले घरी कर्ज मागाया येत..


विसावा क्षणाचा....७


मला नसतो विसावा क्षणाचा

व्हट्स अप वरती आहे स्पर्धावार

दिनरात रचते कविता चारोळ्या

शिकते मी काव्याचे नविन प्रकार...


रुसवा.....८


झुलवू नकोस तु आता मनाला

कर दुर रुसवा ग्रहन नको प्रेमाला

उकल कर प्रेमाची सोडून दुराव्याला

नेवू प्रेम नौका दुरच्या गावाला..


शिस्त....९

मुंग्याची रांग पाहुन

शिस्त त्यांची शान वाटते

मनुष्याच्या रांगेत मात्र

बेशिस्त पणाची लाज वाटते..


प्रतिबिंब....१०

स्वच्छ प्रतिबिंब मनाचा असावा

घोटाळा नसावा समाज कार्यात

प्रेम मिळेल आयुष्यात भरभरुन

जीवंत उरेल बिंब जनमानसात..


जीवन उध्वस्त...११

आयुष्यात कीती वारे जीवन उध्वस्त

करतात आणि निघून जातात

आयुष्यात किती वारे उधानतात

गरिबांचे छ्प्पर उडवून नेतात..


भेगाळलेली माती.....१२

भेगाळलेली मातीचे ममत्व

स्व:ता उपाशी व तहानलेली

देते लेकराना आतून पाझर

तीच माती माय फक्त एकली


Rate this content
Log in