चारोळी
चारोळी
श्वास.. १
श्वासांचे मोल हे समजूनी
दिर्घ श्वास रोज घेत चला
व्यापात ही कामाच्या या
श्वासांचा अहेर द्या जीवनाला
२
मी आहो समुद्रात विचरणारा
मासे पकडणारा कोळी
नाव माझी पान्यावर चाली
भरे माझी मासोळ्याने झोळी...
३
अवती भोवती माझ्या मुंबापूरी
गर्दी अती झाली अन् प्रगती ही
अंगावर घातले कपडे नाही तरी
नाही पहात कोणी माझ्याकड ही
४
क्षणभंगुर या प्रवासात
हसुत खेळुत जगाव
तारतम्य ठेवूनी रहाव
स्व: कष्ट करून खाव..
५
समांतर विचार करून
भेदभाव सगळे विसरुन
अंगी नको मीपनाचा अंह
दये,मायेच तारतम्य ठेवून..
६
प्रयत्नांती परमेश्वर
मेहनतीने बहरावे फुलावे
अगदी तारतम्य बाळगून
अस्तित्वासाठी लढावे...
७
शोभेच्या या आयुष्यात
प्रथमसुख निरोगी काया
निरव्यसनी राहूनीया प्रथम
तारतम्य ठेवा जावू नका वाया..
८
जेवढी चादर असते
तेवढेच पाय पसरवावे
तारतम्य ठेवावे लक्षात
खर्च जरा कमी करावे..
९
जीवन जगण्याची कला शिकविते
नभिचे चंद्र,सूर्य अन तारे विकसीत
तान्हा बाळाला लागते दुधाचे पान्हे
माती,निसर्ग पानी ,वारा व्यवस्थित।।
