Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

तेजस्वीनी

तेजस्वीनी

1 min
13.9K


सन सत्तावन साली चमकली

लढली खुप ती मर्दानी झांसीवाली

संकटासी ते झुंज दिली लढून

करतळी शिर घेवूनी या हाती

मारुनी मरनास जगली ती राणी

देशासाठी गाठ बांधली या जीवनी ...१...


करण्या करीता स्वधर्म पालन

वसा घेतला हा युद्धाचा मनोमन

गद्दाराला धडा शिकविण्या घेतली

धगधगती मशाल तिने पेटवून

होती खरी भारतिय अस्मित नारी

लक्ष्मी बाईस मुजरा करू मानवाकूनी ...२...


राजवाड्यात आग पेटली

राणी लक्ष्मीची झोप गोठली

स्वातंत्र्यासाठी उठली ती चींगारी

अंतरमनातून उडी तिने घेतली,

लक्ष्मी-दुर्गा,भवानीचा अवतार

अद्भूत शक्तीची ज्यौत ही तेजस्वीनी...३...


जंगलातून अन दरीखोऱ्यातून

किल्याच्या उंच बुरुजावरुन,

चालत होती सुकोमल कन्या

दाखविला अखंड शौर्याचा जलवा

लढलीया पाठीवर लेकरू घेवूनी

तुफानी वादंळ हे पदरात बांधूनी...४...


धास्तावलेले ब्रिटिश सरकार

फिरंगीची मान धरातलावर

अशी अद्भूत गाथा रचुनीया

वेश घेई पुरुषी मराठ मोळा

रंगविले मैदान मणिकर्णिकेनी,

अजरामर गान सुवर्णक्षरात लिहूनी ...५ ...


चमके तलवार ही देशसमर्पणी

कडाडली ओजस्विनी राणी

युद्ध केले पृथ्वी-आकाशात

शत्रृला पडली भारी ही दामिणी,

सुचकतेची दिशा राणी लक्ष्मी

झांसीसाठी गेली लक्ष्मी ही लढूनी ...६...


वीरांचा हा धर्म असतो लढणे

सत्यासाठी वीर गतिने मरणे

चिता तिची सजली विलक्षन

सूर्य अवतरला किरणे होवून,

मृत्यू ही असा वीर वीरांगनेला

नारीजातीचा स्वाभिमान उंचावूनी ...७...


Rate this content
Log in