माझ्या रे मना
माझ्या रे मना
माझ्या रे मना असा तू
ठाकू नकोस रे वाह्यात
जिथे तिथे तू नाक खुपसतो
काढेन तुझी चांगलीच मी वरात।।
आले गेले सारे मनात काय रे
असा ठसकी घेवून बसतो
काढिन तूझी धींड मी चारचौघात
गळाचेपून पिचकी देईन म्हणतो।।
राग आणु नकोस तू मला
नाटक प्रेमाचे रे दाखवूनी
खर प्रेम करतो तू म्हणायचा
कां मिळते तुला स्वता:ला पोखरूनी।।
जातीपातिचे राजकारण करून
भाषणात भरतो गोंधळ मनी
गमंत माझी तू करू नकोस
नाक तुझी मी हाताने ठेचीन ।।
सांगे जगाला ज्ञान अन
स्वता:हा कोरडा पाषान असतो
सांगे अंधश्रद्धेला पाठी घालू नका
अन घरी अंगारे धूपारे करतो ।।
ही सरकार बरी नाही
तू हेच सांगत फिरतो
अन स्वता: जावून मैफिलीत
त्यांचेच गोडवे गातो ।।
असा राग येतो मला तूझा
की धडधड पेटवून द्याव तूला
जनाची नाही मनाची तरी ऐकुन
आत्महत्येचा डाग लावणार नाही मला।।