STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Fantasy

4  

Meenakshi Kilawat

Fantasy

स्वप्न पहाता

स्वप्न पहाता

1 min
28.6K


स्वप्न पहाता चहूकडे ती माझी नयने जेंव्हा

तुजलाच सख्या शोधत होते नाही दिसला तेंव्हा।।


नव्हता कधी सोबत माझ्या भासच होई अंती

विचार करता माझी मजला लाजच येई भलती।।


नव्या स्वप्नात उगाच पडले तुझ्या प्रेमात तीथे

वाटे मजशी मनात माझ्या जागत असतो ईथे।।


समोर ये तू स्वप्नातूनी सखी पुरे हा गून्हा

करणार किती कर बहाणेच येवू नकोस पून्हा।।


नाही तर ही बंद करावे स्वप्नामधले गाणे

रोजचेच हे सतावने अन प्राय: येणे जाणे ।।


स्वप्नातसुद्धा नाही माझी अशी वागशिल राणी

माझा मी ना राहिलो अता तुझा झालो साजणी।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy