STORYMIRROR

Latika Choudhary

Abstract Fantasy Romance

4  

Latika Choudhary

Abstract Fantasy Romance

प्रतिक्षा

प्रतिक्षा

1 min
41.3K


असतं आकाश निळं ,कधी निरभ्र

दुधाळ ,निष्पाप मनीचं..

हरणाच्या गतीनं हुंदडतात

मुक्तपणे भावचांदण्या,

दचकत गिधाडी

नजरेला.....!

दाटत राहतात मेघ वेदनांचे

अन उधळत राहते चित्त

वादळासवे...

शब्दांकुर मात्र होतात कधी

कस्पटासमान.....बेघर ....!

फाटत राहते आभाळ कधी

अंतरी मनीच्या.

असहनिय त्या लाटा

देत धडक उसळत...

घुसळत राहतात

अधुरे स्वप्न....मनाचे

तनाचे...!

धरा पोळलेली मनाची आसुसते

पाऊस पावलाला मायेच्या रातदिन,

झुरत राहतात कडा डोळ्यांच्या

आसवांच्या ओलाव्याला,

 मात्र दाटत राहते 

शेवाळ!

 धारा पावसाच्या येतात डोळ्यांच्या

रस्त्याने....,श्रावणझड दुःखाची,

होत राहतो चिखल मनात.

देहात.प्रतिक्षा

कमळ ऊमलण्याची!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract