श्रावणसडा
श्रावणसडा
श्रावणसडा
सुकल्या हिरदाचा
झाकतो तडा
श्रावणसडा
भुकेल्या या भुईला
श्वास दिधला
श्रावणसडा
रुजे अंगणी वेल
प्रीतीचे फूल
श्रावणसडा
रिमझिम बरसे
मन तरसे
श्रावणसडा
सजली वसुंधरा
शालू हिरवा
श्रावण सडा
तुझ्याच आठवणी
डोळ्यात पाणी

