Untitled
Untitled
1 min
1
*गझलवृत्त-व्योमगंगा*
*लगावली-गालगागा × 4*
*वार सारे झेलण्याला जन्मलेली नार आहे*
*वादळे अन,संकटांची नित्य झाली हार आहे*
*ओळखे ती नाटकी ही चाल मोठी माणसाची*
*डाव तो हाणून पाडावा असा निर्धार आहे*
*सज्ज झाली तोंड देण्या स्वैर झाल्या दुष्टतेला*
*दुर्जनाला हात दावत, सज्जनांची यार आहे*
*भान आले वास्तवाचे ,जाणते ती हक्क आता*
*हीन हेतू दानवाचा आज केला ठार आहे*
*पांढऱ्या ह्या कागदावरती अमर ते शब्द होता*
*धाडसाने आज मी मृत्यूस केले पार आहे*
*प्रेमरंगी रंगताना तोडते 'ती' पाश सारे*
*गंजलेल्या बंधनांवर मस्त केला वार आहे*
लतिका चौधरी
दोंडाईचा, जि. धुळे
