STORYMIRROR

Latika Choudhary

Inspirational

2  

Latika Choudhary

Inspirational

रूप तुझे

रूप तुझे

1 min
14.1K


काय आणीतेस माये डोळीयात पानी

तुझ्यारूपामध्ये मी गं जन्म सार्थ मानी

जन्मजात बंधनात,बेडी ही पायात

भोग भोगतेस कशी, जसा कर्मलेख

अश्रू जिरविते नयनी,अंतरी दिनवानी

तुझ्यारूपामध्ये मी गं जन्म सार्थ मानी ।।

रुप तुझे नानापरी, तू निभवी सत्वरी

बळ देई जगण्या बाळा, मृत्यू पत्करूनी

दाखविले मला जग, उदर फाडुनी

तुझ्यारूपामध्ये मी गं जन्म सार्थ मानी ।।

घरासाठी जाळी रक्त, भाव आटवूनी

स्वप्न सारे कोंडी सुप्त, दुज्या हासवुनी

कुठे शोधू माये तुजला, झाले दिनवानी

तुझ्यारूपामध्ये मी गं जन्म सार्थ मानी ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational