STORYMIRROR

Smita Murali

Inspirational

4  

Smita Murali

Inspirational

सावित्री बाई फूले

सावित्री बाई फूले

1 min
442


*बालिकादिन*

चला, चला बालिकादिनाला
साजरा करूया किशोरीमेळा
सावित्रीमाईच्या जन्मदिनी
उपक्रमांनी फुलवु शाळा

सावित्रीच्या लेकी आम्ही
शिक्षणाचा घेवू वसा
कर्तृत्वाने उमटवू चला
जगात आपला ठसा

लिंगभेद दूर करुया
समानता मुल्य रुजवूनी
हक्क आपले बजावूया
कर्तव्याचे भान ठेवूनी

कष्ट आमच्या माईचे
घालवायचे नाही वाया
शिक्षणाचा हक्क बजावू
सन्मानाने जीवन जगाया

बहिणी आमच्या लहानमोठ्या
आणू त्यांना शिक्षणप्रवाही
असा निरंतर प्रयत्न करुया
वंचित राहू नये कोणीही

चूल मूलं सांभाळतच वाढली
आज आमची कर्तृत्वकक्षा
शिक्षणाने मिळाली दिशा
जीवनाला मिळाली सुरक्षा

क्रांतीज्योती ही क्रांतीसूर्याची
त्रिवार तूला लेकींच वंदन
शिक्षण देवून हक्काचे आम्हा
तोडलीस लिंगभेदाची बंधन

स्मिता मुराळी, सोलापूर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational