STORYMIRROR

Smita Murali

Tragedy

3  

Smita Murali

Tragedy

दारिद्रय साखळी

दारिद्रय साखळी

1 min
122

वडलोपार्जित छताखाली 

एकत्र कुटुंबाला पोसतोय

परिस्थितीचे पोटावर घाव

अगदी निमुटपणे सोसतोय


सणवार रीती पाळताना

मस्तकाचीच होते लाही 

कर्जाचा वाढणारा डोंगर

कधी संपता संपत नाही


आजुबाजूचे बंगले गाड्या 

माझ्या दारिद्यावर हसतात

हळव्या मनाच्या संवेदना

मग डोळ्यांवरच रुसतात


गळकं तरी मालकीच छत

त्यास जपता जपावं किती

दंगली वादळ वाऱ्याचीच

घरादाराला वाटतेय भिती


आमच्या पिढ्यानपिढ्या

दारिद्य दलदलीत फसल्या

हातावरच पोट सांभाळत

फक्त कष्ट उपसत बसल्या


आता पुरे दारिद्य साखळी

घडवूया सक्षम पुढची पिढी

शिक्षणाची धरेल जो कास

तोच घेईल प्रगतीची उडी!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy