गुलमोहोर
गुलमोहोर
1 min
501
गुलमोहराच्या फुलांचा
सुंदर लाल शेंदरी रंग
नक्षीदार छत्रीसारखे
जणू भासे त्याचे अंग
रखरखत्या उन्हामध्ये
गुलमोहर कसा फुलतो
लाल शेंदरी रंग लेवूनी
ऊन वाऱ्यासंगे झुलतो
कधी असे हिरवागार
कधी पानाविना रुक्ष
वसंताच्या आगमनी
फुलांनी बहरतो वृक्ष
रानोमाळी उभा राहूनी
सोसतो उन्हाच्या झळा
लालशेंदरी गुलमोहराचा
फुलवावा वाटतो मळा
जून महिन्यात झाडाखाली
गुलमोहरांचा पडतो सडा
पुष्परचना करता करता
कल्पकतेचा गिरवूया धडा!