व्यसन
व्यसन
1 min
744
अमली पदार्थ
सेवनाची नशा
व्यसन संगत
शरीराची दशा
अमली पदार्थ
आरोग्य धोका
तरीही व्यसनी
शोधतो मोका
पार्ट्यांची फॅशन
रोजच दिवाळी
नशेसाठी झाली
संसाराची होळी
वेळीच जाणावे
व्यसनांचे धोके
अवेळी थांबतील
हृदयाचेच ठोके
प्रबोधन सुधारेल
व्यसनी जो सक्त
भारतदेश होईल
व्यसनातून मुक्त
व्यसनमुक्त जनता
देशाची खरी शक्ती
निर्धाराने करु या
चला व्यसनमुक्ती
