कविता माझी
कविता माझी
1 min
824
माझी कविताच
माझ्याशी बोलते
मनातली भावना
शब्दातून खोलते
कधी शब्दात हसते
कधी उगीच रुसते
भावनिक जाळ्यात
कशी अलगद फसते
सोप्या शब्दातली
भावनिक गुंफण
सुर ताल जपते
यमकांचे कुंपण
कविता बनते कधी
निसर्गाच गोड गाणं
कल्पनेच्या दुनियेत
हरवते सर्व देहभान
कविता ही माझी
अमूल्य असं देणं
शब्दातून ही जपते
नेहमी समाजभान