आठवांचा बहर
आठवांचा बहर
1 min
316
आठवांचे मोरपिस
जेंव्हा स्पर्शते हे मन
स्मृती जागता सोनेरी
होई रोमांचित तन
आठवांच्या हिंदोळ्यात
मन पाखरु झुलते
मनी गुपीत जपत
कळी गालाची खुलते
कधी कोसळे आभाळ
उभा दुःखाचा डोंगर
घाव खोलवर करी
आठवांचा तो नांगर
भाव हळव्या मनाचा
कधी उफाळून येई
आठवांच्या बहरात
जीव कासावीस होई
आठवांच्या कुंचल्याने
सारे रंगू दे जीवन
आठवांच्या बहराचे
जपू सुंदर ते क्षण
छळणाऱ्या आठवणी
त्यांची करु पाठवण
देती जगण्या उभारी
मनी त्यांची साठवण