गुढीपाडवा
गुढीपाडवा
1 min
503
आली महामारी
स्थिती ही बिकट
मराठी वर्षांरंभी
हे वैश्विक संकट
पुर्वापार चालतेय
हिदूसणांची रुढी
पाडव्याला उभी
मांगल्याची गुढी
कोरोना व्हायरस
हद्दपार करायचा
जनसंपर्क आता
सर्वांनी टाळायचा
नवीन वर्षारंभी
संकल्प हा करू
जनहित सूचनांचे
पालन आज करू
संपर्काने संसर्ग
पश्चाताप पाळी
जनसंपर्क टाळू
तोडू ही साखळी
शासन प्रयत्नांना
मिळू दे साफल्य
गुढीसोबत येवो
वैश्विक मांगल्य!