चिऊताई
चिऊताई
1 min
965
रम्य बालपण
सुखाचा काळ
चिऊची गाणी
म्हणायचे बाळ
चिऊ काऊची
ऐकली कहाणी
लबाड कावळा
चिमणी शहाणी
छोटीशी चिमणी
अंगणात यायची
चिव चिव करत
दाणेही खायची
घातक लहरीचा
मोबाईल आला
चिवचिवाट कुठे
गडपच झाला
चिऊला परत
आणुया अंगणी
बांधू नवे घरटे
पाजवूया पाणी
प्रमाणात करु
मोबाईल वापर
तेंव्हाच वाढेल
चिऊचा वावर!!!
