कर्फ्यू
कर्फ्यू
1 min
504
कोरोनांन शिकविला
साऱ्या जगाला धडा
कर्फ्युला स्विकारुन
लढतोय आम्ही लढा
खाण्या-पिण्यावर
बंधन नाही राहिले
झाले जे परीणाम
जगाने ही पाहिले
कोरोना हा व्हायरस
जगभर लागला फिरु
संसर्ग लागलाय वाढू
ऋग्णही लागलेत मरु
भयकंर या विषाणुला
आता युक्तीनेच आवरु
कोलमडले जनजीवन
सर्वांनी शर्थीने सावरु
कोरोना प्रतिबंधासाठी
जनसंपर्क आज टाळला
कर्फ्यूचा शासनआदेश
प्रामाणिकपणे पाळला
लोक राहिले घरामध्ये
झाला पारीवारीक संवाद
कर्फ्युचे यशस्वी पालन
सर्वांनी केला थाळीनाद