स्त्रियांची दोन घरं
स्त्रियांची दोन घरं


आम्हा स्त्रियांची असतात दोन घरं...
एक माहेर घर आणि दुसरं सासर घर.....
दोन्हीही आमच्यासाठी असतात घरंच पण त्यातली नाती वेगवेगळी असतात...
एका घरात मुक्तपणे बागडणाय्रा आम्ही.....
दुसय्रा घरात निमुटपणे वावरतो आम्ही....
दोन्ही घरातली नाती जरी वेगळी असली ....
तरी तितकाच जीव लावतो आम्ही सगळ्यांवरती....
एका घरात तुळशीप्रमाणे वाढतो आम्ही.....
तर दुसय्रा घरात डोक्यावर पदर घेऊन तुळशीला पाणी घालतो आम्ही....
माहेरी आईच्या पदरा खाली लपतो आम्ही....
तर सासरी आमच्या पिलांना पदराची छाया देतो आम्ही....
एका घरची मुलगी तर दुसय्रा घरची सुन असा अखंड प्रवास करतो आम्ही....