डोळ्यातल्या आसवांचा अर्थ
डोळ्यातल्या आसवांचा अर्थ

1 min

653
डोळ्यातल्या आसवांचा अर्थ कसा लावायचा????
ओघळणारे अश्रू दुःखाचे की आनंदाचे अंदाज कसा मांडायचा????
दोन्ही वेळा येणारे अश्रू ....रंग मात्र एकच असतो.....
पण त्यांचा वेग थोडा बदलेला दिसतो....
आंनदातल्या आसवांना घाई नसते फार ,येतात हळूहळू पण जातात मनाला प्रफुल्लित करून.....
दुःखातल्या आसवांना मात्र थांबवणं होतं अशक्य....
मनातल्या भावना पाण्यासोबत वाहून पाठवण्याचा निष्फळ केला जातो प्रयत्न....
आसवांची ही कथा माझ्यासाठी राहिली गुपीत बनुन....
कधी कोणाच्या आसवांचा अर्थ कळला तर कधी कोणाचे आसवं राहिले कोडे बनुन....