आईवडील
आईवडील
1 min
220
मोडगळीत पडलेल्या वस्तूप्रमाणे वागतो आपण आपल्या म्हाताऱ्या आईवडिलासोबत. ..
विसरून जातो की आज थकलेले हात पाय कधीकाळी आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत होते. .....
विसरून जातो की ज्या घराच्या जिवावर आपण उड्या मारतोय त्याचा पाया त्यांच्या घामाने उभा आहे. ...
विसरून जातो की स्वतःला शिक्षित समजणारे आपण लहानपणी हातात पाटीपेन्सील देऊन हाताला धरून शाळेची वाट दाखवणारे ते खरे शिक्षित होते. ...
भलेही आज त्यांची आपल्याला गरज नसेल पण त्यांच्या थरथरणाऱ्या हाताच्या आशीर्वादाचे मोल लाखमोलाचे आहे...
