आयुष्य
आयुष्य
आधीच पावसाने आग मनाला लावली
गेली भिजून तूही आग उराशी धावली
झाला फितूर चंद्रा तूं गगनाला आज का
अंधारली अमावस्या तुजला का भावली
केली तिथे चर्चा तूं नाहक माझी माणसा
त्यांची जमात सापांची सगळ्यांना चावली
उन्हात तापलेल्या मी कुठं घेऊ आसरा
ईमानदार राहली नं अता ही सावली
जाळून बैसलो हे जीवन अंधारात मी
का अंतरात होती आयुष्य ही ओलावली