STORYMIRROR

Anil Date

Others

3  

Anil Date

Others

धागे गुंतलेले

धागे गुंतलेले

1 min
29.2K


उभे आयुष्य माझ्यासवे चालू लागले

धागे गुंतलेले जेव्हा उकलू लागले


हात हजारो त्यांचे सरसावले तेव्हा

झाडावर फूल जेंव्हा उमलू लागले


रिता झाला जसा माणसांनी गांव माझा

धर्माचे ओझे सारेच उचलू लागले


शब्द सारे माझे आता अर्थहीन झाले

का तुला साधे बोलणेही सलू लागले


तेव्हा स्वर माझेही सारे स्वरात होते

चुकता ठेका तुझा ते बदलू लागले


Rate this content
Log in