STORYMIRROR

Anil Date

Tragedy

2  

Anil Date

Tragedy

उरलेले पर्णही

उरलेले पर्णही

1 min
14.1K


जे जे भेटले ते प्रेमबंध तोडून गेले

जाता जाता विरहाशी नातं जोडून गेले


रात्रभर संगतीला हे नभातील तारे

होता उषःकाल सोबत ते सोडून गेले


चुकून त्यांना मी कोकीळ समजलो पण

कावळ्याचे बेसूर सूर ते छेडून गेले


अजूनही मार्ग अन् प्रवासी तेच पण

मार्गातील प्रितखुणाही ते खोडून गेले


जाऊन सांगा त्यांना माझा वसंत संपला

उरलेले पर्णही आता ते झडून गेले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy