कृतघ्न
कृतघ्न
आता कसे म्हणू तो आपला आहे
त्याने केसाने गळा कापला आहे
क्षिरसागर पाजणा-याला दंश केला
सापाचा वारसा त्याने जपला आहे
संपले ते नाते जिवाभावाचे आता
पाखराने नवा संसार थाटला आहे
वाटा वैरत्वाच्या मोकळ्या झाल्या
त्याच्यातला प्रेमसागर आटला आहे
तुडवून पायाखाली रेशमी नाते
त्याने कृतघ्नतेचा कळस गाठला आहे