गुन्हा
गुन्हा
ठेवा खुशाल तुम्ही कडेकोट पहारा
देतो तरी हुलकावणी वादळ वारा
घे चंद्र तू कर मालकीचे नभ सारे
काहीच सोबत नेत नाही मरणारा
पाऊस हा पडला सुखाचा अवकाळी
आल्या तरी नयनात माझ्या जलधारा
माझा गुन्हा एवढाच झाला जगताना
झालो फितूर परंपरांचा एक तारा
