" अस्तित्व "
" अस्तित्व "
अहंकारावर पोसल्या गेलेल्या
हव्यासाची भूक, मरत नसलेल्या
स्वतःच्या अस्तित्वासाठी ,
विचार करतोय....." दंगली कशा पेटवाव्यात...?"
गृहीत धरुन लोकांना, समजून च्युतिया.
मीच न सोडवलेले प्रश्न...वर्षानुवर्षांचे
पलट होताच सत्तेचा उलटलेत माझ्यावर...
सरकली जमिन पायाखालची आणि आज...
दावणीला लागलेल्या अस्तित्वासाठी
विचार करतोय...."दंगली कशा पेटवाव्यात....?"
सत्तेचा माज, खुर्चीची खाज
स्वस्थ बसू देत नाहीय.
लोकही आता बघेनाशी झालीत...
कडक सॉल्युट तर कोसो दूर राही
लेत....
जिवंतपणीच ' राख-रांगोळी ' बघून अस्तित्वाची
विचार करतोय...." दंगली कशा पेटवाव्यात....?"
नैतिकता, माणूसकी, संवेदनशीलता, चूक कि बरोबर एकाच शब्दात खल्लास * राजकारण *
बाकी सब झुठ !
कुणी जगो , कुणी मरो
मी, माझी घराणेशाही जिवंत राहीली तरच " देश " जगेल . बस्स........
माझ्या जगण्यासाठीच विचार करतोय...." दंगली कशा पेटवाव्यात.....?"
असंख्य मुद्दे आहेत * राजकारण * या एकाच शब्दात गुरफटवायला सगळी " नैतिकता गुंडाळून".
विचार ठाम
" दंगली आता बघा कशा पेटतील.............."