STORYMIRROR

Shubhada Bhangle

Romance Tragedy

3  

Shubhada Bhangle

Romance Tragedy

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
474

पहिल्या पावसात भिजताना

आठवणी चिंब होतात

डोळ्यात दाटलेले ढग

हळूहळू बरसू लागतात


आठवते का तुला 'ती'

तुझी माझी पहिली भेट

नजरा चुकवून सगळ्यांच्या

माझ्याकडे आलीस थेट


घाबरतच तुझा मी

घेतला होता हात हातात

प्रीतीची ओळख पटली

त्या थरथरनाऱ्या स्पर्शात


काहीही न बोलता आपण

खूप काहीस बोललो

फार पूर्वीच नात असल्यागत

दूर दूरवर चाललो


अचानक काळ्या ढगांनी

गर्दी केली आभाळात

विजेच्या कडकडाटाने

शहारलीस नखशिखांत


टपोरे थेंब पडू लागले

तप्त भूमीच्या चरणी

वरून राजाच्या मिलनाने

तृप्त झाली सारी धरणी


झिमझीमणार्या पावसामध्ये

आपण झालो ओले चिंब

मन अधीर झले ग

टिपण्या अधरावरील थेंब


भंगाभंगातून निथळत होते

डोंगरमाथ्यावरचे ओहोळ

नाकावरून घसरत होता

कापलीवरच्या कुंकवाचा ओघळ


ओल्या साडीतून खुणावे

किंचित ढळलेला तुझा पदर

गोऱ्या पाठीवरील नागिनींचा

वाटत होतं मला मत्सर


गडगडाटाने ढगांच्या

घरची आठवण झाली तुला

तितक्याच आवेशाने

मिठीत घेतलेस तू मला


स्वप्नातल्या परिसारखी

माझ्या आयुष्यात आलीस

चार महिन्याच्या पावसासारखी

तू दूर निघून गेलीस


किती आले पावसाळे

मला न भिजवताच गेले

पावसाच्या थेम्बथेंबातून

अश्रू माझे मिसळून गेले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance