माझे मन
माझे मन
मी चांदणी नभातली ..
तू चंद्र माथ्यावरला ,
मी भानामती सारखे ! का ? भाळू नये .
कळी मी देहातली
थर थरता श्वास घेऊन
रोखवस वाटतं तुला ?
मनातून घट्ट बिलगून
अगदी सायंकाळ ही
उधळून द्यावी गुलालाने,
बघ !
जरा ती सोनपिवळी सायंकाळ
ही वाट बघते तुझी,
थोडं गुलाबाचं हसणं मागून घे.
जरा माझ्याकडे येताना...
मी मखमली शाल होऊन...
तू सुगंधित गुलाब हो.
तुझ्या मिठीतले ते तुझे भरगच्च बाहू !
गोलाकार वलय करून,
जखडून घट्टं बनून सोडत,
तुझा मर्द पणा जाणवतो त्या देहाला
पण माझ्या देहाला
मला हवी असते रे!
तुझी मिठी
तुझ्या मिठीतलं कुरवाळणं
अख्य विश्व
बनून जातं माझं