वृक्ष
वृक्ष
बघ ना, प्रिये!
हा आपल्या पहिल्या प्रेमाची...
आठवण करून देणारा वृक्ष आहे ,
बघ ना
अजूनही आपली नावे त्यांवर
तशीच्या तशीच आहेत कोरलेली
काय गं?
किती तरी वेळ लागला होता
हे सारं करायला .
केवढी घाबरायची तू हे नाव
कोरताना तुझ लक्ष सारं इकडेतिकडे असायचं.
आठवतंय मला
रोज- रोज त्या कल्पवृक्षाखाली भेटायचो
एकदा मी तूला भेटण्याच
ठिकाण बदलायला लावलं होत.
माझ्या घरापाशी तुला बोलवलं होत.
आणी तू मिटून पापण्या
माझ्याशी बोलत होतीस.
तूझा तो कोमल निरागस हसरा
चेहरा ....
खूप हळवं होतं ग?
ते तुझ बोलणं अगदी जीवाला
झोबणार होतं .
त्या बोलणाऱ्या ओठांनी ..
मी तुला माझ्या ओठांचा स्पर्श दिला होता.
तू किती विव्हळली होतीस .
त्या माझ्या काटेरी स्पर्शाने
तन शहारून गेलं होतं .
तो स्पर्श म्रुदु वाटू लगला होता तुला
सर्व विसरून कोणाचाही
विचार न करता
कधी तू त्या झाडाच्या
आडून माझ्या मिठीत आली.
झुळुझुळूवाहणारी नदी.
तो कल्पव्रुक्षाचा गारवा ....खरंच....
तेंव्हा अंगात
भिनत होता