STORYMIRROR

UMA PATIL

Romance

4  

UMA PATIL

Romance

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
41.5K


आला पहिला पाऊस

जीव कासावीस होई

झाले माझे मन वेडे

धाव तुझ्याकडे घेई


असा कसा राजसा तू

तुला याद नाही माझी

जीव गुंतला तुझ्यात

आठवण छळे तुझी


गंध पसरे मातीचा

जणू अत्तराचा वास

तुझ्या येण्याची चाहूल

सख्या, लागली रे आस


मनसोक्त भिजू दोघे

पहिल्याच पावसात

क्षण पावसाचे छान

राहू दोघे एकांतात


तूच प्राणसखा माझा

तुझ्या नावाचा हा साज

दिसे समोर जेव्हा तू

गाली येई बघ लाज


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance