STORYMIRROR

UMA PATIL

Others

3  

UMA PATIL

Others

कविता

कविता

1 min
560


माझी कविता म्हणजे काय?

मनातल्या शब्दांचे गुंफण

हृदयी कायमच्या कोरलेल्या

भावनांचे नाजूक कोंदण.....[१]


कधी शांत, संयमित, मृदु

कधी कविता असते निखारा

ज्वलंत, धगधगणारा, अंगार

विद्रोही कवितेमुळे येतो शहारा.....[२]


सुगंधासाठी काही मिसळले शब्द

तरलतेने ओवला शब्दांचा हार

आनंदी असेल मी जर का,

कविता असते सुखाची धार.....[३]


मनातली भावना उतरते कागदावर

तेव्हाच तर कविता बनत जाते

आपल्या आयुष्यातील क्षणांचा

ती मग अलगदतेने मागोवा घेते.....[४]


जीवनात जेव्हा प्रेम असते

तेव्हा नाजूक प्रेमाचे चित्रण 

चिंध्या झाल्यावर मनाच्या मात्र

ओरबाडलेल्या हृदयाचे कात्रण.....[५]


भिडावी रसिकांपर्यंत कविता

मग कवितेने घालावा दंगा

नित्य झरावी लेखणीतून

ही कवितेची अविरत गंगा.....[६]


Rate this content
Log in