गौरव मराठीचा
गौरव मराठीचा
1 min
602
माझ्या मराठी भाषेचा
आहे मला अभिमान
चला गाऊयात सारे
मराठीचे गुणगान...
चौदाखडी पाटीवर
कौतुकाने लिहूयात
गोड आपल्या वाणीने
मराठीत बोलूयात...
परकीय शब्दसुद्धा
उरी सामावून घेते
तिच्यातले प्रेम सारे
पूर्ण जगताला देते...
वृत्ते, कविता, गझल
मराठीचे अलंकार
मात्रा, उकार, वेलांटी
हाच भाषेचा श्रृंगार...
मराठीचा हा गोडवा
सदा अमर रहावा
गोड भाषेचा सन्मान
सर्व लोकांनी करावा...
अशी मधाळ मराठी
शोभे कशी राजभाषा
सदा रहावी, टिकावी
एवढीच एक आशा...