" एका प्रेयसीचे पत्र "
" एका प्रेयसीचे पत्र "
कसा आहेस तु
बरा आहेस ना ...
खुप दिवस झाले
तुझ्याशी मनातलं
बोलायचं होतं ...
पण जमलचं नाही
म्हणून लिहण्याचा
हा खटाटोप ...
किती जिव पनाला
लावला होता माझा
होकार मिळविण्यासाठी ...
जेंव्हा माझ्या आयुष्याचा
लिलाव झाला
तेंव्हा माझ्या होकाराला
काहिच महत्व नव्हते ..
जर त्या वेळेस एक पावुल
चालले असते तर
आज पावला गनीक काटे
वेचण्याची वेळ माझ्यावर आली नसती ..
खरचं तुला दुःखाच्या घाईत लोटुन
मीही सुखी नाही ,
आज मला विचारले कशी आहे
तर बरी आहे एवढंच बोलते मी ,
तुझी ती पहिली मिठी आणि ती
ती पहिली रात्र खुप अंतर होते रे
सजवलेली शेज माझी चिताच होती
त्या रात्री आसवे गळत होती
पण त्यात समाधान दिसत होते
त्या व्यक्तीला पण ती आसवे
म्हणजे एका दुर्बल प्रेयसीने
प्रियकराच्या
प्रितीला वाहलेली
श्रध्दांजली माझ्या मते ....
आज जेंव्हा केंव्हा कोणी गावाकडंल
भेटते तेंव्हा तु कसा आहेस विचारते मी
जेंव्हा तुझ्या बद्दल ऐकते मग भावनांच्या
चक्रीवादळात खेचल्या जाते की
खरचं किती प्रेम करत होता ...
तु माझं काहीच ऐकनार नाही
माहित आहे मला पण तरीही
माझ्या भाबडीचा हा प्रयत्न
की नवीन पहाट बघं ...
मी आजही तुझ्याकडे आली तर
तु स्विकार करशील माझा ,
पण न येने हा नाईलाज आहे
तु नाहीतर तुझे नाव माझ्या ओठावर
अन् नजरे समोर असते
माझ्या मुलाला मी तुझेच नाव दिले
मलाच माझ्या बद्दल सहानुभूती म्हणून ..
शेवटी एवढच सांगते तु बघ माझ्या
राजा नव स्वप्नं नव जगं
खुप आयुष्य आहे रे समोर
असा माझ्या आठवांच्या कोसल्यात
मरू नकोस त्याला भेदुन काढ
मग समजेल मी जरी हरले
तरी माझ्या प्रेमाचा विजय झाला ..