तुझं माझं एक विश्व हवं
तुझं माझं एक विश्व हवं
तुझं माझं एक विश्व हवं
चंद्र आणि चांदणीच जसं.
रात्री आकाशी सुंदर सजावं
अंधारात काजवं फुलतं तसं...
तुझं माझं एक विश्व हवं
कळीचं आणि फुलाचं जसं...
रातराणीच्या सुगंधी नहावं
कुपित अत्तर सामावतं तसं...
तुझं माझं एक विश्व हवं
स्पंदनं आणि हृदयाचं जसं...
देहातून जसं चैतन्य प्रकटावं
शिंपल्यात मोती यावा तसं...
तुझं माझं एक विश्व हवं
लेखणी आणि कागदं जसं
भावनांनी शब्दातून उतरावं...
हातानेच नशीब लिहावं तसं
तुझं माझं एक विश्व हवं
चिमणा आणि चिमणी जसं
पिलासाठी दिसभर उडावं
संसाराचं खोपं विणावं तसं.