प्रिये -- कविता
प्रिये -- कविता
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
नुसतंच पाहण्यानं तुझ्या नजरेतलं
काहूर मला कसं कळायचं
माझं काळीज माझं मलाच पोळायचं
प्रिये तुला कधी गं हे सारं कळायचं
नुसतंच हसण्यानं तुझ्या हास्यातलं
गुपित मला कसं कळायचं
माझं ओठ माझं मलाच चटकायचं
प्रिये तुला कधी गं हे सारं कळायचं
नुसतचं चालण्यानं तुझ्या पैंजनातलं
मधुर गीत मला कसं कळायचं
माझं मन माझं मलाच झुलवायचं
प्रिये तुला कधी गं हे सारं कळायचं