वृक्षारोपण
वृक्षारोपण
1 min
649
झाडे तोडली
वने गाडली
कृती नडली
चूक घडली
वर्षा पळाली
राने जळाली
धूप वाढली
माती गळाली
ऊन छळते
पाणी पळते
हवा पोळते
तन जळते
फळे ,सुमने
थंड सावली
गुणी औषधी
तरू माऊली
मित्र हे तरू
सांभाळ करू
वृक्षारोपण
कास हो धरू
वृक्ष रे लावा
संकल्प नवा
मिळेल हवा
ध्यास घे भावा
