STORYMIRROR

yuvaraj jagtap

Others

3  

yuvaraj jagtap

Others

नको पावसा रुसू

नको पावसा रुसू

1 min
329

नको रे पावसा

नको असा रुसू

काळ्या काळ्या ढगात

नको लपून बसू


वाऱ्यासंगे ढगांमध्ये

पिंगा तू रे घाली

पाण्यासाठी जीव माझा

होतोय वर खाली


रानी पडल्या भेगा

आस लागली तुझी

रुसवा तुझा फार झाला

वाट लागली माझी


वाट तुझी पाहून

डोळे आता थकले

किती तरी जीव

जीवास आपल्या मुकले


कुठेच नाही पाणी

वाकून बघ मेघा

थोडा तरी पड रे

नको देवूस दगा


मान्य करतो मी

चूक माझी झाली

हवी तशी झाडी

मीच खूप तोडली


आता कळली चूक

झाडे मी लावीन

थेंब थेंब पाण्याचा

जपून वापर करीन


रुसवा तुझा सोड आता

वाट पाहती वृक्ष लता

सांड जलकुंभ जाता जाता

थांबव ही चित्तरकथा



Rate this content
Log in