Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

yuvaraj jagtap

Others

4.7  

yuvaraj jagtap

Others

आम्ही वारकरी

आम्ही वारकरी

1 min
1.8K


आम्ही वारकरी। सारे शाकाहरी ।।

करी तुझी वारी। विठुराया ।।


कपाळी हा गंध । कीर्तनाचा छंद ।।

तुझा माझा बंध । अतुटची ।।


तुळशीची माळ । हातामंदी टाळ ।।

अष्टगंधी भाळ । नित्यनेमे।।


भगवी पताका । पाऊलांचा ठेका ।।

वारीचा या डंका । सर्वदूर ।।


शुभ्र वस्त्र अंगी । किती असो तंगी ।।

भजनात रंगी । पांडुरंगा ।।


मुखी हरिपाठ । तनी तुझी भेट।।

हृदयात थेट । हरी राया ।।


सद् आचरण । शुद्ध बीजे मनी ।।

रंगतो किर्तनी । भक्ती भावे ।।


धरी एकादशी। कशा हवी काशी।।

राहतो उपाशी । मनोभावे ।।


माऊली रिंगण।पंढरी दर्शन।।

चंद्रभागा स्नान । तुझ्या दारी।।


युवा वारकरी । पोचवितो वारी ।।

दर्शन दे हरी । भक्ताला या ।।


Rate this content
Log in