STORYMIRROR

yuvaraj jagtap

Others

3  

yuvaraj jagtap

Others

रक्षा बंधन (हायकू रचना)

रक्षा बंधन (हायकू रचना)

1 min
559

रक्षा बंधन

नाते रेशमी बंध

रक्षेचा गंध


बहिणी घरी

भाऊरायाची स्वारी

चैतन्य दारी


बसण्या पाट

सभोवार रांगोळी

छोटी दिवाळी


ओवाळी ताई

राखी बांधते हाती

जपते नाती


औक्षण होता

भावाची ओवाळणी 

भाळ चरणी


Rate this content
Log in