ऋतू बरसला
ऋतू बरसला
ऋतू बरसला
निळ्या आभाळी
कातर वेळी
प्रीतीचा मोगरा फुलला
ऋतू बरसला
ऋतू बरसला
प्रीतीची ही रात साजणा
स्पर्श तुज मज होता
रोम रोम शहारून गेले
अन केवडा दरवळला
ऋतू बरसला
ऋतू बरसला
कुशीत तुजिया
सरली रात
मोहक झाले
पारिजात
वेणीचे हे पाश सोडिता
श्वास आणिक थांबला
ऋतू बरसला
ऋतू बरसला