का उगी आज चंद्रमा 🌜
का उगी आज चंद्रमा 🌜
का उगी आज चंद्रमा
सांज रातीस बोले
का उगी आज चंद्रमा
चांदण्या ही नभी आज
कोणास भाळतो चंद्र हा
विरहात जळतो एकला
रातीत असतो सोबती हा
मेघच्या अडूनी कसा पहा
झकाळतो चेहरा तुझा हा
का उगी आज चंद्रमा
हसरी पौर्णिमा साथीला
हळव्या क्षणाच्या साक्षीला
चांदवा निरागस का भासला
येरव्ही तू खोडकर भारी
भावनेची करी कुरघोडी
येशी आज काय हत्कुनी
केली कोणी तुला ही सरशी
आज लाडिक चेहरा हासरा
जणू निखळ निरागस चंद्रमा
भरले डोळा काजळ अन
हासते नभी आज पौर्णिमा
कुणा चांदनीचा असे तुज
लागला लळा चकोरा
का दाविसी भावनांचा
हा खेळ मज निराळा
आज ओठावरती हसू
शितल छाया तुझी
खुणावते कुणा प्रेयसीला
ओढ नित्यनव्या प्रितीची तुला
भासतो तरीही एकला का आज
का उगी आज चंद्रमा
का विरहात रोहिणीच्या
झुरतो अंधारात एकला
आज कळली प्रिती तुझी
भासे निरागस गोड किती
भाळली सांज ज्याच्यावर
तो निरागस प्रियकर

