STORYMIRROR

sarika k Aiwale

Abstract Romance Inspirational

4  

sarika k Aiwale

Abstract Romance Inspirational

रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा

1 min
229

रंग माझा  वेगळा 

उंच अकाशीचा  चांदवा ही  भूलला 
इंद्रधनुचे रंग ही हारले या रुपाला 
खिळता ती नजर क्षितिजावर ली
सांज ही भुलली  जिच्या  रुपाला 

अबोल परी बोलकी नजर लावून 
गेला सुर्य ही बेमालूम अस्तला 
शुन्यात नजर तिची शोधते अजून 
त्या रंगांधळा पारिजातकला 

आसवांचे ही फुले  बहरली  असती
कोवळ्या उन्हात करपला देह सारा 
ऐन वयात होती एक अनामिका ती
बावरला तिच्या हसण्यला खट्याळ वारा 

ती मात्र शांतपणे वाचत होती 
तिच्या  रंग हीन आयुष्याचा उतारा..हा 
क्षितिजावर लिहिलेली कथा ही 
लहरींच्या स्वैर अनुवाद ती  भासावा

हलकेच सांगते हेच ही नदीही गुणगुणता
भुलली ती नजर चांदव्याची निशेला 
रंग वेगळा होता त्या कळीचा 
अशी एक सांज भेटली त्या नभाला 



✍sari 
©️सारिका  ऐवले.. 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract