गोठ
गोठ
एक अनाहूत आर्त हाक नित्य मनी ऐकते
झुंज नशिबशी रात्र ही दिवसात बदलते
अनोळखी जगात सार्थ अभिमान मागते
दिशा बदलून अंधारी, कुस भाग्य हे लेते
शब्दांत भावनांना मन हे आवर घालते
अनोळखी दिशांसवे नजरबंदी खेळते
नित्य नव्या आव्हानांना आपलीशी वागते
दुरावल्या सावलीतला शिंपला मी वेचते
रोजचीच सांज येते रोज का अंधारी लेते
अनोळखी दिशांतून साद मायेची खुणावते
एक अनाहूत आर्त हाक नित्य मनी ऐकते
झुंज नशिबशी रात्र ही दिवसात बदलते
✍@Sari
©️®️सारिका ऐवले
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
