STORYMIRROR

sarika k Aiwale

Action Inspirational

3  

sarika k Aiwale

Action Inspirational

देशाभिमान

देशाभिमान

1 min
14

नसा - नसांत भिनतो निनाद स्वातंत्र्याचा 

आठवतो तो लढा भारतीय भुमिपूत्रांचा 


देशासाठी जाहले ते एक मन एक भाव 

आहुतीस त्यांच्या देतो मनात उच्च स्थान 


पाटीवर गिरवतो आम्ही माझा भारत महान 

सह्याद्रीचा सिंह गर्जतो , मावळ्यांची ती शान 


निधड्या छातीवर प्रहार झेलती सीमेवरी जवान 

सैनिक आपण ही व्हावं स्विकारुन स्वदेशी मान  


देश माझा भारत अखंड राहो या विश्वात प्यारा 

तन मन धन अर्पण माझे अस्तित्व त्याच्या चरणा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action