STORYMIRROR

Savita Jadhav

Tragedy Action

3  

Savita Jadhav

Tragedy Action

हाहाकार

हाहाकार

1 min
169

हाहाकार पावसाचा

खूप खूप जोरावला

नायनाट सगळ्यांचा

करूनच स्थिरावला


पोरंबाळं,गुरंढोरं

कासावीस सारी झाली

डोक्यावर छत नाही

झाला विध्वंस ती भ्याली


पावसाच्या पाण्यासंग

होतं नव्हतं वाहिलं

पण माणसाचं धैर्य

त्याच्या सोबत राहिलं


मदतीचे हात खूप

आले होते सोबतीला

काडी काडी जुळवून

उभारले घरट्याला


निसर्ग हा कोपला 

हाल हाल झाले सारे

ऐक रे वरूणराजा

नको प्रकोप दावू रे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy