महापुरूष
महापुरूष
मी एक महापुरूष
वैचारीक क्रांती करून
इतिहास जमा झालेला.
कुणालाही न समजलेला ...!!!
माझंच आज भांडवल
माझे समर्थक करून
माझं राजकारण झालेला
कुणालाही न समजलेला...!!!
कोट्यावधी रूपयांचा निधी
पुतळ्यासाठी खर्च करून
माझेच विचार पुरलेला
कुणालाही न समजलेला...!!!
सुविचारी म्हणून सर्वांनीच
स्वहीतासाठी बोलबाला करून
अगदी डोक्यावर घेतलेला
कुणालाही न समजलेला...!!!
ज्ञानकक्षा रुंदावत मौलिक
मूल्यांची हेटाळणी करून
गप्प निवांत बसलेला
कुणालाही न समजलेला...!!!
जनसामान्यांच्या ह्रदयात राहूनही
आजच्या स्वार्थी युगात फक्त
पुतळ्यात नामशेष झालेला
कुणालाही न समजलेला...!!!