Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance Tragedy

4.0  

Rakesh More

Romance Tragedy

प्रेम असंच असतं का?

प्रेम असंच असतं का?

1 min
12K


कुणीतरी सांगा आता 

प्रेम असंच असतं का?

कितीही जपलं तरी 

मन असंच फसतं का? ||0||


वेडावून जातात आता 

निसर्गाच्या दिशा दाही 

तिच्याशिवाय काय सांगू 

सुचत नाही मला काही 

आपलं असलं तरीही 

मन आपलं नसतं का?

कितीही जपलं तरी 

मन असंच फसतं का? ||1||


अनपेक्षित घडतं सारं 

थांग पत्ता लागत नाही 

मन ही शहाण्यासारखं 

आता मुळीच वागत नाही 

विरहाच्या भीतीपोटी 

मन असंच धसतं का?

कितीही जपलं तरी 

मन असंच फसतं का? ||2||


काहीतरी होतंय हे 

घडल्यावर कळतं मग 

तिच्याशिवाय कसं सांगू 

सुनं सुनं वाटतं जग 

मनही मग अशा वेळी 

कंबर अशीच कसतं का?

कितीही जपलं तरी 

मन असंच फसतं का? ||3||


विनाकारण चेहऱ्यावर 

अधून मधून स्माईल दिसते 

चारचौघात बऱ्याचदा 

वेगळीच आपली स्टाईल दिसते 

प्रेमात वेडं झालेलं 

मन असंच हसतं का?

कितीही जपलं तरी 

मन असंच फसतं का? ||4||


हृदय आपलं तिचंच आता 

घर झालेलं असतं 

सारं चित्र निसर्गातलं 

धूसर झालेलं असतं 

हृदयात आपल्या कोणाचं 

प्रेम असंच वसतं का?

कितीही जपलं तरी 

मन असंच फसतं का? ||5||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance