हॅपी बर्थडे
हॅपी बर्थडे
1 min
5
आज तुमचा वाढदिवस
तुमचा उत्कर्ष होवो
माझ्याइतकाच तुमच्यासाठी
प्रत्येकाला हर्ष होवो || 0 ||
दुःख सारी गळो तुमची
चिंता सारी जळो तुमची
दरदिवशी आम्हाला
भरभराट कळो तुमची
नवं नवं शिखर गाठून
उल्हासित हे वर्ष होवो
माझ्याइतकाच तुमच्यासाठी
प्रत्येकाला हर्ष होवो || 1 ||
निरोगी आरोग्य लाभो
संकटेही दूर पळो
लक्ष्मी आणि सरस्वतीची
कृपा तुमच्याकडे वळो
देवतांचा तुमच्यासाठी
आपसात परामर्ष होवो
माझ्याइतकाच तुमच्यासाठी
प्रत्येकाला हर्ष होवो || 2 ||